Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओवेसीच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

ओवेसीच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली
, सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (15:14 IST)
एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी रॅलीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्र. 19 मधील एमआयएमचे उमेदवार जुबेर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी ओवेसी पुण्यात भवानी पेठ भागात रॅली काढणार होते. मात्र ओवेसी यांची भाषणे प्रक्षोभक आणि जातीयवादी असतात, शिवाय त्यांच्या जीवालाही धोका आहे. या कारणांमुळे हा परिसर त्यांच्या रॅलीसाठी अयोग्य असल्याचे सांगत, खडक पोलीस ठाण्याने रॅलीला परवानगी नाकारली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोटांची सत्यता पडताळण्यासाठी जवानांना आरबीआयकडून प्रशिक्षण