समुद्रात बोट उलटली, 32 विद्यार्थींचा जीव वाचवण्यात आला

शनिवार, 13 जानेवारी 2018 (15:08 IST)
पालघरमधील डहाणू येथे समुद्रात बोट उलटली असून त्यात 40 विद्यार्थी बसले होते. बोटीत के.एल.पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी होते. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून बचावकार्य सुरु करण्‍यात आले आहे.
 
2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली. समुद्रात आजुबाजूला असलेल्या बोटीही विद्यार्थ्यांच्या मदतीला गेल्या. बोट उलटण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING