Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू-श्रीनगर नेशनल हाईवेवर दरिमध्ये कोसळली कार, मृतांचा आकडा 10, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

accident
, शुक्रवार, 29 मार्च 2024 (14:33 IST)
जम्मूच्या रामबनमध्ये गुरुवारी मध्य रात्री एक कार 300 फुट खोल दरिमध्ये कोसळली. या भीषण अपघातात 10 लोकांचा मृत्यु झाला. हा अपघात जम्मू-श्रीनगर नेशनल हाईवे 44 वर रामबनच्या बैटरीचश्मा जवळ झाला. जम्मू मध्ये सकाळी पासून खूप पाऊस पडत होता. ज्यामुळे बचाव अभियान पण प्रभावित झाले. अपघातात मृतांची संख्या वाढू शकते. रेस्क्यू टीमच्या मते पॅसेंजरकॅब श्रीनगरहुन जम्मूला जात होती. पण खूप पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावरून सरकुन दरिमध्ये कोसळली. 
 
रेस्क्यू ऑपरेशन सुरु 
जम्मू-कश्मीरच्या पोलिसांनी सांगितले की, रामबन परिसरात बैटरीचश्मा जवळ जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्ग वर एक यात्री टॅक्सी खोल दरि मध्ये कोसळली आहे. सूचना मिळताच पोलिस, एसडीआरएफ (सदरफ) आणि सिविल क्यूआरटी रामबनची टीम वेळेवर पोहचली. व रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. 
 
 2 मृत व्यक्तींची ओळख पटली 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार दारीमध्ये मिळालेले दोन मृत व्यक्तींची ओळख बलवान सिंह पुत्र पूरब सिंह निवासी अम्ब घ्रोठा जम्मूच्या रुपात झाली आहे. तसेच, दुसऱ्या मृत व्यक्तीची ओळख विपिन मुखिया पुत्र विश्वनाथ मुखिया निवासी बिहार चंपारण मधील असल्याचे समजले आहे. 
 
केंद्रीय मंत्रीनी दुःख व्यक्त केले 
रामबन रस्त्यावरील झालेला आपघाताकरिता केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी  दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या अपघाताची माहिती मिळताच, आम्ही सारखे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रति मी भावना व्यक्त करतो.  

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवू इच्छित, सुप्रिया सुळेंचा आरोप