Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गीरच्या जंगलात सिंह धोकादायक व्हायरसचे बळी, 18 दिवसात 23 सिंहाचा मृत्यू

गीरच्या जंगलात सिंह धोकादायक व्हायरसचे बळी, 18 दिवसात 23 सिंहाचा मृत्यू
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात प्रसिद्ध गिर अभयारण्यात सिंहाचा मृत्यू होण्याची घटना थांबण्याचे नावच नाहीये. मागील 18 दिवसात धोकादायक कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस (सीडीव्ही) आणि प्रोटोजोवा संक्रमणामुळे 23 सिंहाचा मृत्यू झाला आहे.
 
वेबदुनिया गुजरातीच्या प्रतिनिधीच्या रिपोर्टप्रमाणे 26 सिंह असलेल्या या अभयारण्यात आता केवळ तीनच सिंह जिवंत आहे. सिंहाच्या मृत्यूमुळे प्रशासन काळजीत आहे. तीन सिंहांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी अमेरिकेहून विशेष इंजेक्शन मागवलेले आहेत तसेच काही सिंहांना सेमरणी क्षेत्रातून रेस्क्यू करून जामवाला क्षेत्रात पाठवण्यात आले आहेत.
 
वनमंत्री गणपत सिंह वसावा यांनी दोन दिवसांपूर्वी जूनागढजवळ सासण गिर येथील दौरा करत मृत सिंहाबद्दल चौकशी केली होती. एका अधिकार्‍याप्रमाणे सिंहाच्या मृत्यूमागील मुख्य कारण यांच्यात आपसात भांडण आणि यकृत संसर्ग आहे. वन विभागाच्या एका इतर अधिकार्‍याने सांगितले की दलखनिया व्यतिरिक्त अजून कुठेही मृत्यू झालेले नाही.
 
त्यांनी म्हटले की व्हायरसचा धोका असल्यामुळे समार्दीहून 31 सिंहांना सुरक्षित जागेवर पोहचण्यात आले आहे. सर्वांचा चेकअप केला गेला आहे. 600 सिंहातून 9 आजारी आहे आणि 4 वर तेथेच उपचार करण्यात आला, जेव्हाकि 5 ला उपचार हेतू रेस्क्यू केले गेले आहे.
 
काय आहे सीडीव्ही व्हायरस आणि कसं पसरतं : कॅनाइन डिस्टेंपर धोकादायक संक्रामक व्हायरस आहे. याला सीडीव्ही असेही म्हटले जातात. याने ग्रसित जनावरांचे जिवंत राहणे कठिण असतं. हा रोग प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये दिसून येतो. तसेच कॅनाइन फॅमिलीत सामील लांडगा आणि लोकर यांच्यात देखील हा रोग आढळतो. कुत्र्यांद्वारे व्हायरस इतर जनावरांमध्ये पसरतो.
 
याव्यतिरिक्त हा व्हायरस वार्‍यामुळे किंवा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपात व्हायरसमुळे ग्रसित एखाद्या जनावराच्या संपर्कात आल्याने पसरतं. व्हायरसमुळे ग्रसित झाल्याच्या एका आठवड्यानंतर या आजाराचे लक्षण दिसू येतात. हा रोग वाईट वॅक्सीनमुळे पसरू शकतो. बॉयोकेमिकल टेस्ट आणि युरीन टेस्टने कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस असल्याचं कळून येतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोबाइलच्या खराब नेटवर्कुळे हैराण असाल तर करा हे उपाय!