Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरियाणात ईदच्या दिवशी स्कूल बसचा अपघात, चालक मद्यधुंद अवस्थेत, 6 मुलांचा मृत्यू

हरियाणात ईदच्या दिवशी स्कूल बसचा अपघात, चालक मद्यधुंद अवस्थेत, 6 मुलांचा मृत्यू
, गुरूवार, 11 एप्रिल 2024 (12:11 IST)
Haryana Bus School Bus Accident हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात स्कूल बस उलटून सहा मुलांचा मृत्यू झाला. 15 हून अधिक मुले गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कनिना शहरातील उन्नी गावाजवळ घडला. नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या मधोमध उलटली. बस वळताच मुलांमध्ये आरडाओरडा झाला.
 
प्रवाशांनी बचावकार्य करत जखमी मुलांना बसमधून बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी जमा झाले. मुलांचे पालकही घाईघाईत घटनास्थळी पोहोचले. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले. काही मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रेवाडीला पाठवण्यात आले आहे.
 
ओव्हरटेकिंग अपघाताचे कारण
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्याने अपघाताचे कारण ओव्हरटेकिंग असू शकते. चालक भरधाव वेगात गाडी चालवत असताना अचानक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. मुलांनी आरडाओरडा सुरू केल्यावर रस्त्यावरून जाणारे लोक धावत आले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
 
ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचा आरोप
पोलीस स्टेशन प्रभारी उदयभान यांनी सांगितले की, बस कनिना शहरात असलेल्या जीएलपी नावाच्या खासगी शाळेची होती. आज ईदची सुट्टी होती, मात्र सुट्टीच्या दिवशी शाळा का उघडण्यात आल्या, याचा तपास केला जाणार आहे. चालक नशेत होता, याचाही तपास केला जाईल, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

25,000 नोकऱ्या, 400 रुपयांना एलपीजी सिलिंडर- अरुणाचलसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी कोणती खास आश्वासने?