Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत मुसळधार पाऊस, १५ तासांत दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद

मुंबईत मुसळधार पाऊस, १५ तासांत दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद
, सोमवार, 9 जुलै 2018 (08:59 IST)
मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात १५ तासांत महापालिकेच्या ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांपैकी अनेक केंद्रांवर दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
 
रविवारी दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात हिंदमाता, परळ टी.टी., गांधी मार्केट, सायन येथील मुख्याध्यापक भवन, सायन रोड क्रमांक २४, सायन येथील हेमंत मांजरेकर मार्ग, अँटॉप हिल येथे पाणी साचले होते. पूर्व उपनगरात चेंबूर येथील शेल कॉलनी आणि पोस्टल कॉलनी, कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार आणि काळे रोड, एलबीएस मार्गावरील शीतल सिनेमा परिसरात पाणी साचले होते. पश्चिम उपनगरात गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, बीकेसीमधील कपाडियानगर येथे पाणी साचले होते.
 
याशिवाय सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचे विशेषत: बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले होते. यात किंग्ज सर्कल, वडाळा, गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, घाटकोपर येथील नित्यानंदनगर, सायन, साकीनाका, चेंबूर नाका, मिलन सबवे, हिंदमाता फ्लायओव्हर, अमर महल जंक्शन, पवई, मुलुंड, वांद्रे येथील लिकिंग रोड, वडाळा येथील अँटॉप हिल येथील ठिकाणांचा समावेश होता. मुंबई शहरात ४, पूर्व उपनगरात ५, पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारकडून जेनेरीक औषधांना प्रोत्साहन