Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हैद्राबादमध्ये काळ बनून आला पाऊस, भिंत पडल्याने चिमुकल्यासोबत 7 जणांचा मृत्यू

cyclone
, बुधवार, 8 मे 2024 (12:19 IST)
ग्रेटर हैद्राबादमध्ये मोठ्या प्रमाणात पशु झाल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुसळधार पाऊसामुळे एक भिंत पडून त्याखाली चार वर्षाचा चिमुकला व सात प्रवासी मजूर यांच्या दाबल्यामुळे मृत्यू झाला आहे. 
 
ग्रेटर हैद्राबादमध्ये मुसळधार पाऊसामुळे अनेक समस्यांना हैद्राबाद मधील नागरिक तोंड देत आहे. याच मुसळधार पावसामुळे चार वर्षाचा चिमुकला व सात मजूर यांचा मृत्यू झाला आहे. हैद्राबादमध्ये हा अवकाळी पाऊस काळ बनून आला. या पाऊसामुळे रस्ते जलमय होऊन काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री मेडचल मल्काजगिरी जिल्ह्याच्या बाचुपल्ली मध्ये रेणुका येलम्मा कॉलनीमध्ये  एक निर्माणाधीन अपार्टमेंट घडली आहे.  बुधवारी सकाळपर्यंत बचावकार्य कर्मचार्यांनी मृतकांचे मृतदेह बाहेर काढलेत. हे लोक ओडिशा आणि छत्तीसगढ येथील श्रमिक होते. पोलिसांनी मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवलेत. हैद्राबाद आणि तेलंगानाच्या इतर जिल्ह्यांमध्ये मंगळवारी संध्याकाळी जलद गतीने वाहणारी हवा आणि मुसळधार पाऊसामुळे परिसरात पाणी भरून अनेक झाडे कोसळे आहेत.  

Edited By- Dhanashri Naik   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगरचे नाव बदलण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात पूर्ण होईल, फडणवीसांचे आश्वासन