Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्रोकडून १०० व्या उपग्रहाचे प्रक्षेपण

इस्रोकडून १०० व्या उपग्रहाचे प्रक्षेपण
, शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (16:04 IST)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. या उपग्रहात PSLV C 40 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं कार्टोसॅट २ उपग्रह अवकाशात झेपावलं. या उपग्रहात देश-विदेशातले अन्य ३१ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आले आहेत.

हवामान निरीक्षणासाठी उपयोगात आणला जाणारा हा उपग्रह इस्रोच्या ताफ्यातला १०० वा उपग्रह आहे.इस्रोकडून लॉन्च करण्यात आलेल्या पीएसएलव्ही सी-४० रॉकेटच्या माध्यमातून ३१ सॅटेलाईट्समध्ये २८ विदेशी आणि ३ स्वदेशी उपग्रह आहेत. या ३१ सॅटेलाईट लॉन्चिंगच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी २ तास २१ मिनिटांचा वेळ लागला. कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या उपग्रहांसह भारताचा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडण्यात आले आहेत. या ३१ उपग्रहांचं एकूण वजन १ हजार ३२३ किलो आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कपड्यांवर किती खर्च करतात पीएम मोदी, RTIच्या प्रश्नावर कार्यालयाने ही माहिती दिली