Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्नाटक : मित्राचा गळा चिरून रक्त प्यायले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

crime
, सोमवार, 26 जून 2023 (11:51 IST)
कर्नाटकात एका व्यक्तीने आपल्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. गळा चिरून त्याने रक्त प्यायले. ही संपूर्ण घटना त्या व्यक्तीच्या मित्राने मोबाईलमध्ये कैद केली असून त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे
 
सदर घटना चिक्कबल्लापूर शहरातील आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. विजय असे आरोपीचे नाव असून त्याने मारेश नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून त्याचे रक्त प्यायले मारेशचे  आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याने त्याने मारेशचा गळा चिरून त्याचे सांडलेले रक्त प्यायले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 19 जून रोजीची आहे. विजयने त्याचा मित्र जॉनसोबत मारेशला जंगलात नेले. तेथे मारेशचा गळा चिरून त्याचे रक्त प्यायले. जॉनने हे कृत्य त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.
चांगली गोष्ट म्हणजे मारेशचा गळा चिरल्यानंतरही जिवंत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. मारेशच्या तक्रारीवरूनच पोलिसांनी विजयला अटक केली. विजय आणि जॉन या दोघांची चौकशी सुरू आहे.
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खोलीत बांधलेल्या 50 गायींची सुटका, तस्करीच्या आरोपाखाली एकाला अटक