Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्याप्रकारे राजीव यांना मारले, त्याचप्रमाणे पीएम नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, पत्रामध्ये सनसनाटी खुलासा

ज्याप्रकारे राजीव यांना मारले, त्याचप्रमाणे पीएम नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, पत्रामध्ये सनसनाटी खुलासा
देशात भाजपच्या वाढत असलेल्या लोकप्रियतेने रागात असलेले माओवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे कट रचत आहे. हा खुलासा एका पत्राद्वारे झाले आहे. हे पत्र प्रकाश नावाच्या व्यक्तीला संबोधित करत लिहिले गेले आहे.
 
पुणे पोलिसाने कोटाला सांगितले की प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) शी संबंधाच्या आरोपात अटक केलेल्या पाच लोकांमधून एकाच्या घरात हे पत्र सापडले आहे ज्यात माओवादी एक आणखी राजीव गांधी कांड याची योजना आखत असल्याचा उल्लेख आहे.
 
पोलिसांनी डिसेंबरमध्ये येथे आयोजित एल्गार परिषद आणि नंतर जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसा संबंधात गुरुवारी दलित कार्यकर्ता सुधीर धावले, वकील सुरेंद्र गाडलिंग, कार्यकर्ता महेश राऊत आणि शोमा सेन व रोना विल्सनला क्रमशः: मुंबई, नागपूर व दिल्ली येथून अटक केली होती. सर्व पाची आरोपींना आज सत्र न्यायालयात प्रस्तुत केले गेले, जिथून त्यांना 14 जून पर्यंत पोलिस कस्टडीत पाठवण्यात आले.
 
अभियोजक उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला सांगितले की दिल्लीत रोना विल्सनच्या घरातून मिळालेल्या पत्रात एम-4 रायफल आणि गोळ्या खरेदी करण्यासाठी आठ कोटी रुपयांची गरज असल्याची बाब लिहिली होती. यासह त्यात ‘एक आणखी राजीव गांधी कांड’ चा उल्लेखही केले गेला होता.
 
आरोपीच्या घरातून जप्त केलेल्या चिट्ठीत लिहिले आहे की पीएम मोदी यांचे पूर्ण देशात वाढत असलेली प्रसिद्धी आणि वर्चस्व आमच्या पक्षासाठी धोकादायक आहे. मोदी लहरीचा फायदा घेत भाजप देशात 15 हून अधिक राज्यांमध्ये आपली सरकार बनवण्यात यशस्वी ठरली आहे. अशात मोदी यांचा खात्मा करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. आम्ही राजीव गांधी कांड प्रमाणेच हे संपवण्याचा विचार करत आहोत. ज्याने हे आत्महत्या किंवा अपघात वाटावे. पत्राप्रमाणे मोदी यांना कोणत्याही रोड शो मध्ये टार्गेट केलं जाऊ शकतं. 
webdunia
हे पत्र एका कॉमरेड प्रकाश याला संबोधित आहे आणि पत्र लाल सलाम ने सुरू झालेले आहे जेव्हाकि शेवटी केवळ 'आर' लिहिले आहे. यावर 18 एप्रिल 2017 तारीख लिहिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फुटबॉल विश्वचषकावर सायबर हल्ल्याचे सावट