Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेट एअरवेजच्या विमानात मोबाईलचा स्फोट

जेट एअरवेजच्या विमानात मोबाईलचा स्फोट
, सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:42 IST)

दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला आहे. ज्या प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला ती व्यक्ती दिवाळीनिमित्त कुटुंबासोबत इंदूरला जात होती.  ही घटना जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक 9W 0791मध्ये घडली. अर्पिता धाल ही या विमानातून प्रवास करत होती. तिने आपला मोबाईल पर्समध्ये ठेवला असताना मोबाईलचा स्फोट झाला. दिल्ली एअरपोर्टवरुन हे विमान सकाळी १०.२० मिनिटांनी निघाले होते. ज्यावेळी विमानात प्रवाशांना ब्रेकफास्ट दिला जात होता तेव्हा ही घटना घडली.

घटना घडली तेव्हा अर्पिताने ती पर्स पायाजवळ ठेवली होती. यावेळी अचानक मोबाईलचा स्फोट झाला आणि त्याने पेट घेतला. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा विमान हजारो फूट उंचीवर उडत होते. यादरम्यान, विमानातील निष्काळजीपणाही समोर आला. जेव्हा मोबाईलने पेट घेतला तेव्हा विमानात आग विझवण्याचे यंत्र कामच करत नव्हते. त्यामुळे पाण्याने आग विझवावी लागली. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहो आश्चर्यम : नागपूरमध्ये प्रदूषण कमी झाले