Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय खरंच गोरं बनवतं तैवानी मशरूम

काय खरंच गोरं बनवतं तैवानी मशरूम
गुजरातमध्ये निवडणूक प्रचार दरम्यान काँग्रेस नेता अल्पेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खाजगी हल्ला केला आहे. अल्पेश यांनी म्हटले की मोदी यांच्या त्वचेचा रंग आधी डार्क होता परंतू आता असे नाही. पंतप्रधान यांचे गाल आता लाल झाले आहेत. गुजरात निवडणूकीमध्ये तैवानी मशरूम देखील प्रचाराचा भाग झाला आहे. ट्विटमध्ये येऊ लागले की गोरं होण्याचा दावा करणार्‍या कंपन्या क्रीममध्ये मशरूम मिळवतात. त्यांनी म्हटले की मोदी दररोज चार लाख रुपये किमतीचे मशरूम खात आहे. यामुळे त्यांचे गाल लाल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक मजेशीर ट्विट केले गेले.
webdunia
#MashroomEffect, #MashroomMania, #Mashroom हॅशटॅग ट्विटर वर ट्रेड होऊ लागले. लोकं प्रसिद्ध लोकांचे फोटोसोबत मशरुमचे इफेक्ट सांगू लागले. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रजनीकांत यांचे फोटो लावले गेले. बघा मजेदार ट्विट्स-
webdunia
भाजपने व्हिडिओद्वारे दिले उत्तर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेता अल्पेश ठाकोर यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेता तेजिंदर बग्गा यांनी ट्विट करून अल्पेश यांच्या हल्ल्याचे उत्तर दिले आहे. बग्गा यांनी तैवान येथील एका मुलीचा व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यात ती म्हणत आहे की येथे गोरं करणारे मशरूम मिळत नाही तसेच यात मुलीने तिच्या देशाला राजनीतीमध्ये न आणण्याची अपील देखील केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराटच्या बालपणीचे प्रेम आहे अनुष्का