Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'गज' चक्रीवादळाचे संकट; राज्यात ढगाळ वातावरण

'गज' चक्रीवादळाचे संकट; राज्यात ढगाळ वातावरण
पुणे , मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (09:46 IST)
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाच्या पट्‌ट्याचे रूपांतर 'गज' चक्रीवादळात झाले आहे. तळिमनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारी भागात ते 48 तासांत धडकण्याचा अंदाज आहे. 2 महिन्यांपूर्वीच्या तितली वादळापेक्षा या चक्रीवादळाची तीव्रता जास्त आहे. गज वादळ ताशी 12 किमी वेगाने तामिळनाडू व आंध्रकडे सरकत आहे. येत्या 48 तासांत ते कुंडलोर (उ.तमिळनाडू) व श्रीहरिकोटाच्या किनारी भागाला धडक देईल. या वादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
 
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यातील अनेक भागांत तसेच विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊसही पडू शकेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंटरनेट हा काय प्रकार आहे ? ७० टक्के पाकिस्थानी नागरिकांना प्रश्न