Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सबरीमाला मंदिरात प्रवेशावरून घमासान सुरू

सबरीमाला मंदिरात प्रवेशावरून घमासान सुरू
, मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (15:54 IST)
केरळच्‍या सबरीमाला मंदिरात दुसर्‍या दिवशीही प्रवेशावरून घमासान पाहायला मिळाले. महिलांना प्रवेश देण्‍याच्‍या परवानगीनंतर देखील प्रवेशाच्‍या कारणावरून काही भाविकांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात एक छायाचित्रकार जखमी झाला आहे. 
 
एक महिला मंदिरात जाण्‍याचा प्रयत्‍न करत असल्‍याचे वृत्त पसरले होते. परंतु, नंतर स्‍पष्‍ट झालं की, ती ५२ वर्षीय महिला असून थ्रीसूरची राहणारी आहे. धार्मिक मान्‍यतेनुसार, या मंदिरात १० वर्षांपेक्षा कमी आणि ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्‍या महिलांनाच प्रवेश दिला जातो. याचदरम्‍यान, आंदोलनाला सुरुवात झाली. आणि त्‍या महिलेला मंदिरात प्रवेश मिळाला नाही. नंतर त्‍या महिलेने पोलिस बंदोबस्‍तात पूजा केली. 
 
सुप्रीम कोर्टाने गेल्‍या महिन्‍यात सर्व वयोगटाच्‍या महिलांना मंदिरात जाण्‍याची परवानगी दिली होती. परंतु, मंदिर आणि काही भाविकांनी विरोध करत आंदोलन केले. कोर्टाच्‍या निर्णयानंतर पुन्‍हा या मंदिरात विशेष पूजा होत आहे. मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत ही पूजा सुरू राहणार आहे. त्‍यानंतर मंदिर पुन्‍हा बंद होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेजप्रताप यादव गायब, आणखी एक धक्कादायक प्रकार