Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रजासत्ताक दिनीच पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

प्रजासत्ताक दिनीच पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

वेबदुनिया

WD
भारताच्या प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवरील भारतीय चौकीवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

लष्कराच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमधील कमान पोस्ट येथे पाकिस्तानी सैनिकांनी 26 जानेवारीला सकाळी साडे सहाच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत गोळीबार केला. भारतीय जवानांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, भारत आणि पाक लष्करी अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर प्रथमच पाक सैन्याकडून शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi