Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Redmi Note 5 Pro झाला स्वस्त, खास ऑफर्स...

Redmi Note 5 Pro झाला स्वस्त, खास ऑफर्स...
Xiaomi Redmi Note 5 Pro प्रसिद्ध स्मार्ट फोन्समधून एक आहे. फोन खरेदी करणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. फ्लिपकार्ट वर सुरू असलेली बिग बिलियन डेज सेल मध्ये Redmi Note 5 Pro (रिव्यू) मध्ये 12,999 रुपयात उपलब्ध आहे.
 
Xiaomi इंडिया प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विटरवर ही माहिती देत म्हटले की ही पहिली संधी आहे जेव्हा Xiaomi Redmi Note 5 Pro स्वस्त किमतीत उपलब्ध होत आहे. दोन रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर असलेले शाओमीच्या या हँडसेटला 2018 फेब्रुवारीत लाँच केले गेले होते.
 
बातमी प्रमाणे Xiaomi Redmi Note 5 Pro सेल दरम्यान 12,999 रुपयात विकलं जाईल. फोन या किमतीत ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि मी डॉट कॉम वर उपलब्ध असेल. या फोनची किंमत 14,999 रुपयापासून सुरू होते.
 
या किमतीत रेडमी नोट 5 प्रो चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट विकला जातो. हाच वेरिएंट 2,000 रुपये स्वस्त होईल. फ्लिपकार्ट वर सुरू असलेली बिग बिलियन डेज सेल मध्ये यूजर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून अतिरिक्त 10 टक्के सूट मिळवू शकेल. या प्रकारे आपण Xiaomi Redmi Note 5 Pro 12,000 रूपयाहून कमी किमतीत खरेदी करू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या देशाचा पासपोर्ट आहे जगातील 'सर्वात सामर्थ्यवान', जाणून घ्या भारताची रँकिंग