Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलम्पिकमध्‍ये भारताची आजवरची उत्‍कृष्‍ट कामगिरी

ऑलम्पिकमध्‍ये भारताची आजवरची उत्‍कृष्‍ट कामगिरी

वार्ता

बिजींग, , गुरूवार, 21 ऑगस्ट 2008 (09:34 IST)
अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळविल्‍या पाठोपाठ पैलवान सुशील कूमार ने कुस्‍तीमध्‍ये कांस्य पदक जिंकल्‍यानंतर तर मुष्‍टीयोध्‍दा विजेंद्र कूमारने आपले कांस्‍यपदक निश्चित केल्‍यानंतर बिजींग ऑलम्पिकमध्‍ये भारताची आजवरची सर्वोकृष्‍ट कामगिरी ठरली आहे.

भारतासाठी बिजींग ऑलम्पिकचा 12 वा दिवस तसा लकी ठरला आहे. या एकाच दिवसांत भारताच्‍या हाती 1 कांस्य पदक लागले तर एक कांस्य पदक निश्चित झाले आहे. यासोबतच भारताने यंदाच्‍या ऑलम्पिकमध्‍ये तीन पदकांची कमाई केली आहे. ऑलम्पिकमधील 108 वर्षांच्‍या इतिहासातील देशाची ही सर्वोकृष्‍ट कामगिरी आहे.

यापूर्वी भारताचे ऑलम्पिकमध्‍ये फक्‍त दोन वेळा दोन-दोन पदकांची कमाई केली हाती. 1900 या वर्षी पॅरिसमध्‍ये झालेल्‍या ऑलम्पिकमध्‍ये भारताने दोन रजत पदक जिंकले होते. तर 1952 च्‍या हेलसिंकी ऑलम्पिकमध्‍ये भारताला हॉकीत एक सूवण्र आणि एक रजत पदक मिळविता आले होते. हेलसिंकीतील खेळ भारतीय ऑलम्पिकची आजवरची सर्वश्रेष्ठ कामगिरी होती. हेलसिंकीत भारताने हॉकीत सुवर्ण तर कुस्‍तीत कांस्‍य पदकाची कमाई केली होती.

बिजींगमध्‍ये भारताने आतापर्यंत अभिनव बिंद्राचे नेमबाजीतील सुवर्ण सुशीलकुमारचे फ्रिस्‍टाईल कुस्‍तीतले कांस्य मिळविण्‍या सोबतच मुष्‍टीयोध्‍दा विजेंद्रचे 75 किलो मिडलवेट गटातील कांस्‍य पदक निश्चित केले आहे. विजेंद्र उपांत्‍य सामन्‍यात विजयी झाला तर तो सुवर्ण किंवा रजत पदकही मिळवू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi