Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताचे बिजींग ऑलम्पिक मिशन संपन्न

भारताचे बिजींग ऑलम्पिक मिशन संपन्न

वार्ता

बिजींग , सोमवार, 25 ऑगस्ट 2008 (10:25 IST)
भारताच्या 108 वर्षांच्या ऑलम्पिक इतिहासात यंदा भारताने सर्वश्रेष्‍ठ कामगिरी बजावून एक सूवर्ण व दोन कांस्य असे एकूण तीन पदक जिंकून बीजिंग ऑलम्पिक मिशनला पूर्ण विराम दिला आहे.

निशानेबाजीत अभिनव बिंद्राने 10 मीटर एयर रायफल स्पर्धेत सूवर्ण पदक जिंकले. त्यानंतर पहेलवान सुशील कुमारने कांस्य पदक तर मुक्केबाजीत विजेंद्र कुमारने ऑलम्पिकच्या 14 व्या दिवशी कांस्य पदक प्राप्त केले. महिला रिले टीम ही बाहेर पडल्याने बीजिंग ऑलम्पिकमधील भारताची कामगिरी समाप्त झाली. बॅडमिंटनची सायना नेहवाल हिनेही महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. महिला तीरंदाज टीमनेही उपउपांत्य फेरीत पोहचली. मात्र तेथे त्यांचा टिकाव लागला नाही. एकंदरीत भारताची गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वश्रेष्ठ कामगिरी राहिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi