Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजेंद्रच्‍या वडीलांना पोलिसांची धक्काबुक्की

विजेंद्रच्‍या वडीलांना पोलिसांची धक्काबुक्की

वार्ता

नवी दिल्ली, , मंगळवार, 26 ऑगस्ट 2008 (09:43 IST)
भारतात क्रिकेट आणि इतर खेळांमध्‍ये काय फरक असतो ते सोमवारच्‍या रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान तळावर पहायला मिळाले. क्रिकेटर्सच्‍या आई-वडीलांना घराघरात ओळखले जाते. तर दूस-या बाजूला बिजींग ऑलम्पिकमध्‍ये देशासाठी कांस्य पदक जिंकून आणणा-या विजेंद्र कुमारच्‍या वडीलांना पोलीसी धक्‍काबुक्‍कीचा सामना करावा लागतो.

विजेंद्र सोमवारी रात्री चीनहून परतणार असल्‍याने त्‍याच्‍या आई-वडीलांसह कुटुंबातील इतर सदस्‍य त्‍याच्‍या स्‍वागतासाठी विमान तळावर आले. जेव्‍हा या विजयी वीराचे वडील महीपाल आपल्‍या मुलाच्‍या स्‍वागतासाठी व्‍हीआयपी लॉंजमध्‍ये जाऊ लागले त्‍यावेळी तेथे सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्‍यात आलेल्‍या दिल्ली पोलिस आणि सीआयएसएफच्‍या जवानांनी त्‍यांना आत जाण्‍यापासून रोखले. इतकेच नव्‍हे तर त्‍यांनी हे जाणून घेण्‍याचा प्रयत्‍नही केला नाही.

जेव्‍हा महीपाल यांनी आपण विजेंद्रचे पिता असल्‍याचे सांगितले तेव्‍हाही पोलीस आणि जवानांनी त्‍यांना आत जाऊ तर दिले नाहीच आणि त्‍यांच्‍यासोबत धक्का-बुक्की केली. विजेंद्रचे वडील महीपाल यांनी या गोष्‍टीबद्दल तीव्र शब्‍दात नाराजी व्‍यक्‍त केली आहे. या प्रकाराने त्‍यांच्‍या डोळ्यात पाणी आले. ज्‍याच्‍या मुलाने देशाला आजवरचे पहिले कांस्‍य पदक मिळवून दिले त्‍याच्‍या वडीलांना अशा प्रकारची वागणूक मिळणे निश्चितच योग्‍य नाही.

हरूनही जिंकला विजेंद्र...

Share this Story:

Follow Webdunia marathi