Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतीत ड्रोन मिशन राबविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे

dhananjay munde
, बुधवार, 20 डिसेंबर 2023 (08:18 IST)
शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबविण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असेही श्री मुंडे यांनी सांगितले.
 
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्याची घोषणा श्री. मुंडे यांनी यावेळी केली. यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 22 हजार ग्रामपंचायतीमध्ये वॉटर ग्रीड योजना आणणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहीर करुन ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी रुपये इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असल्याचे मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.
 
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सुरेश धस, प्रज्ञा सातव, नरेंद्र दराडे, अरुण लाड, अभिजीत वंजारी, अनिल परब, रमेश कराड, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला होता.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे