Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑल द बेस्ट, राज्यात १२ वीच्या परीक्षांना सुरुवात

exam
, बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:17 IST)
राज्यात  १२ वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. त्याआधी पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने बोर्डाकडून महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. परीक्षे संदर्भात काही होणार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  परीक्षेसाठी एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
 
विज्ञान शाखा : ७,६०,०४६
कला शाखा : ३,८१,९८२
वाणिज्य : ३,२९,९०५
वोकेशनल : ३७,२२६
आय टी आय : ४७५०
 
परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपरच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी २.३० पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे. प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी १,९४,४३९ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आलीये.
 
ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरला  परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केलेय.

Edited By -Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भेट महत्त्वाची : शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची घेतली भेट