Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशोक चव्हाण यांचे ते वक्तव्य साफ चूक - मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस

अशोक चव्हाण यांचे ते वक्तव्य साफ चूक - मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस
, शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (09:40 IST)
महाराष्ट्र राज्याचे सत्ता केंद्र असलेल्या विधानसभेचे अधिवेशन २८ फेब्रुवारी रोजी संपेल, त्याचवेळी मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार आहेत तर लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील होतील असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले, त्यावर वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य होत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सोबतच अशोक चव्हाण यांचं विधान चुकीचं असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करणार असे स्पष्ट करत विधानसभा बरखास्त होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद येथे अशोक चव्हाण यांनी ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचे विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे  आवाहन केले होते. तसेच चव्हाण यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका देखील केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीन महिन्यापासून पालघर भूकंपामुळे हादारतोय