Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवकाळीनं बळीराजाची चिंता वाढवली! राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार

rain
, मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (20:21 IST)
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे.
 
दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं.  राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज  हवामान विभागाने वर्तवला आहे.  त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  आधी दुष्काळाच्या झळा आणि आता अवकाळीची अवकळा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.
 
मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जोर दिसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळणार आहे.
 
आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यवतमाळ वगळता आज कुठेही राज्यात गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली नाही . दरम्यान, राज्यात पुढील दोन तीन दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. त्यानंतर राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 
रब्बी पिकांना मोठा फटका
अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे. दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : पाटील