Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वरोर्‍यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

वरोर्‍यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
चंद्रपूर- बाजारात जाणार्‍या आई वडीलांनी आपल्या पाच वर्षीय लहान मुलीचा सांभाळ करण्यासाठी घराजवळीच एका युवकाला सांगून गेले मात्र त्या नराधम युवकाने खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना 15 जानेवारीला सायंकाळी घडली. त्या नराधमास पोलिसांनी अटक करून पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
 
पीडित मुलीचे आई वडील आठवडी बाजारात जात असल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे वाड्यातील दोन घराआड असणार्‍या अमोल धनराज यसांबरे याच्याकडे आपल्या मुलीला ठेवले. या मुलीसोबत एक मुलगी खेळत होती. त्या नराधमाने त्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
 
काही वेळात आई वडील येताच पीडित मुलगी रडत होती. तू का रडत आहे असे आईने विचारतास घडलेला सर्व प्रसंग सांगितला. हा प्रकार माहीत होताच नागरिकांनी त्या नराधमाला चांगलाच चोप दिला व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी 23 वर्षीय अमोल धनराज येसांबरेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखिलेश यादव यांना सायकल चिन्ह