Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे
, शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (09:23 IST)
- तर महाराष्ट्राची राज्य भाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका – धनंजय मुंडे
 
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही गुजराती वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे सरकारचा महाराष्ट्राचे संपूर्ण गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा निषेधार्ह प्रकार असल्याची संतप्त टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
 
‘वंदे गुजरात’या गुजराती वाहिनीवरुन महाराष्ट्रातील शिक्षकांना धडे देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. इयत्ता पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम नुकताच बदलण्यात आला आहे. या अभ्याक्रमासाठी संबंधित विषयांच्या शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दुरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’वाहिनीला डावलून वंदे गुजरात या वाहिनीची निवड केली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
 
सरकारला गुजरातीचे इतकेच प्रेम असेल तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका, असा टोलाही मुंडे यांनी लगावला आहे. तसेच सरकारच्या या गुजराती आणि जिओ प्रेमाचा धिक्कार असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतक-यांच्या समक्ष पिककापणी करा, खासदार भावनाताई गवळी यांचे निर्देश