Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोकुळच्या दुधाच्या दरातही वाढ

गोकुळच्या दुधाच्या दरातही वाढ
, बुधवार, 22 मे 2019 (17:28 IST)
गोकुळची दरवाढ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निवडक दूध संघाची दरवाढी संदर्भात कोल्हापुरात बैठक गायीच्या दुधात लवकरच दोन रुपयांची होणार वाढ विक्री सोबतच खरेदी दरातही होणार आहे. ही दूध दरवाढ उद्यापासून होणार असून यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे ४२ रुपयांची विक्री ४४ रूपये होणार तर खरेदी दरामध्ये देखील दोन रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या २३ रुपये प्रति लिटर दुधाची खरेदी होते, ती २५ रुपये होणार आहे.
 
राज्यात दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतक-यांच्या दूध विक्रीला तीन रुपयांची वाढ तर ग्राहकांना दूध खरेदीला दोन रुपयांची दरवाढ करण्यात आलीय. त्यामुळे आपोआपच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ होणार आहे. खासगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील कात्रज डेअरी येथे ही बैठक पार पडली. कात्रज, अमुल, चितळे, कृष्णांसह राज्यातील इतर दूध उत्पादक ब्रँडचाही यात समावेश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही हे ठरवू