चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदिर का नाही झाले – आमदार हेमंत टकले

चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदिर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करत नाही तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार @HemantTakle यांनी मिडियाशी बोलताना केला.
 
शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला त्या मेळाव्यात अयोध्येत राममंदिर बनवण्याचा मुद्दा सेनेने उपस्थित केला त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार हेमंत टकले यांनी जोरदार टीका केली आहे.
 
लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख रोज एक नवीन भाषण देत असतात. त्यात एखादा नवीन विषय आणला जातो ज्यात ना देशाचे ना राज्याचे हित असते. भाजप शिवसेनेचा मित्रपक्ष आहे परंतु शिवसेना आपले विचार असे मांडते की मित्रपक्ष नाही तर शत्रूपक्ष आहे आणि सत्ता सोडत नाही तर सत्तेत राहून दबाव टाकण्याचे आमचे काम आहे असे सांगत असतात. अरे हे कसले राजकारण, असा संतप्त सवालही आमदार हेमंत टकले यांनी यावेळी उपस्थित केला.
 
देशातील आणि राज्यातील सामान्य नागरिक हैराण झाला आहे. आज देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती काय आहे, लोकांच्या काय समस्या आहेत, लोकांना असुरक्षित वाटत आहे, मॉब लिचिंगचे प्रकार होत आहेत. यासह प्रत्येक क्षेत्रात विदयार्थी खूष आहे ना शेतकरी खूष आहे ना कामगार आणि असंघटीत कामगार खूष आहेत. फक्त दिखावा सुरु आहे. याचा लोकांना आता त्रास होऊ लागला आहे आणि या गोष्टीवरही लोकांचा भरोसा राहिलेला नाही, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING