Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिची सरकारी नोकरीसाठी अजब फसवणूक, मूर्खपणाचा कळस

तिची सरकारी नोकरीसाठी अजब फसवणूक, मूर्खपणाचा कळस
, सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:45 IST)
पुणे येथे एका महिलेची फार विचित्र फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे ही महिला सरकारी कार्यालयात नोकरीला लागली मात्र तिची फसवणूक झाली असा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाचा सविस्तर ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवत. महिला व तिच्या दिराच्या नोकरीसाठी त्यांनी २ लाख ७० हजार रुपये एकाला दिले दिले होते या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये महिनाभर आवक, जावक इतर किरकोळ स्वरुपाची कामे देखील केले आहे. मात्र पगाराविषयी विचारणा केल्यावर उपजिल्हाधिका-यांनी कानावर हात ठेवत विचारले की बाई आपण तुम्हाला ओळखतच नाही. पैसे देऊन नोकरी लागते, असा प्रकार होत नाही, त्यामुळे पुजापाठ करुन उदरनिर्वाह करणा-या या कुटुंबाला हा मोठा धक्काच बसला आहे. कोंढवा पोलिसांनी श्रीकांत पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवार हा देव मामलेदार संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डेटा एंट्री आॅपरेटर असल्याचे या महिलेला समजले. याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका ३३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेचे पती उदरनिर्वाहासाठी मिळेल त्या ठिकाणी पुजापाठ करतात. कात्रज येथील खंडोबा मंदिरात त्यांच्या दीराला ५ ते ६ महिन्यांपूर्वी श्रीकांत पवार याची भेटले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावतो, असे सांगून त्यासाठी दीड लाख रुपये घेतले होते/ नातेवाईकांकडून व पतसंस्थेतून कर्ज काढून पवार याला २ लाख ७० हजार रुपये दिले. १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पवार याने या महिलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुक शाखेमध्ये पवार भेटले. त्याच्या सांगण्यावरुन त्या साधारण महिनाभर आवक जावक, इतर किरकोळ स्वरुपांची अर्ज टाईप करणे, शिक्के मारणे यासारखी कामे या महिलेने केले.  कार्यालयातील महिला व इतरांशी ओळख झाली.मग पगाराचे काम पाहणारे चव्हाण यांच्याशी ओळख झाली. तेव्हा त्यांनी पैसे देऊन नोकरी लागते का याबाबत विचारणा केली. त्यांनी असा काही प्रकार होत नाही, असे सांगितले. त्यांना कामावर येऊन एक महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला असताना पगार न झाल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांची त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन भेट घेऊन पगाराची विचारणा केल्यावर त्यांनी या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. उलट पैसे देऊन नोकरी लागते असा प्रकार होत नाही सरकरी आणि इतर टिकाणी सुद्धा होत नाही असे स्पष्ट केले. मोनिका सिंगच्या सांगण्यावरुन त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच स्मारकाचे काम पूर्ण केले नाही - मुख्यमंत्री