Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई मध्ये तरुणाने जोतिषी बनून महिलेकडून 53 लाख घेऊन फसवले

मुंबई मध्ये तरुणाने जोतिषी बनून महिलेकडून 53 लाख घेऊन फसवले
, शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (10:36 IST)
मुंबई मध्ये एका तरुणाने ज्योतिषी बनून एक महिलेकडून 53 लाख घेतले. जेव्हा महिला पैसे परत मागायला लागली तर त्याने परत दिले नाही. यानंतर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या तरुणाला त्याच्या इतर पाच साथींवर अंधश्रद्धा विरोधात अधिनियम केस नोंदवून चौकशी सुरु केली आहे. 
 
मुंबई मध्ये फसवणुकीचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने ज्योतिषी बनून आपल्या साथीदारांसोबत मिळून एका महिलेला फसवलेत. जेव्हा महिलेला फसवणूक झाल्याची जाणीव झाली तेव्हा तिने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार बोरिवलीमध्ये राहणारी ही महिला 57 वर्षाची या महिले सोबत आणि तिच्या  कुटुंबाची हा तरुण फसवणूक करीत होता. आरोपीने या महिलेला हॉटेलमध्ये बिजनेस पाटनरशिपचे काबुल केले होते. याकरिता त्याने महिलेकडून 52.80 लाख रुपये आणि 268 ग्राम सोन्याचे दागिने घेऊन घेतले. 
 
पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीने महिलेला हॉटेल बिजनेससाठी पैशांची मागणी केली. नंतर महिलेने जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा त्याने दिले नाही. पोलिसांनी या आरोपी विसरुद्ध धोकेबाजी आणि अंधश्रद्धा, काळी जादू विरोधी अधिनियम केस नोंदवली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणूक सीटसाठी वर्षा गायकवाड यांना बनवले उमेद्वार