Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हायकोर्टाने चिकनवरून झापले सरकारला, वजन वाढवण्यासाठी बाजारात इंजेक्शनचा वापर

हायकोर्टाने चिकनवरून झापले सरकारला, वजन वाढवण्यासाठी बाजारात इंजेक्शनचा वापर
, मंगळवार, 26 जून 2018 (15:18 IST)
रविवार असो वा नुकताच पडलेला पाऊस त्यामुळे अनेक लोक मांसाहार करतात. तर अनेक चिकनचा आस्वाद घेतात. बाजारातून चिकन विकत  मुंबईकरांनो घेताना सावधानाता बाळगली पाहिजे. यामध्ये कोबंड्यांचं वजन वाढवण्यासाठी बाजारात इंजेक्शनचा सर्रास वापर करण्यात येत आहे. एक जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार झापले आहेत. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे वजन वाढावण्यासाठी व्यवसायिक कोंबड्यांना अॅण्टीबायोटिक्स इंजेक्शन दिले जाते अस पुढ आले आहे. हे वजन वाढवण्यासाठी इंजेक्शनची बाजारात  विक्री होत केली जात आहे.
 
इंजेक्शन दिलेल्या चिकनच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही परिणाम दिसतोय. जनावरांच्या कुठल्याही औषधासाठी पशुवैद्यकिय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे, इंजेक्शनची बाजारात सर्रासपणे विक्री केली आहे. बाब समोर येताच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. यावर कारवाई का करत नाही. आरोग्य विभाग झोपला आहे का असे संतप्त विचारणा केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुलंच्या साहित्यावर आधारित हिंदी मालिका लवकरच