Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळी अधिवेशन कालवधी वाढवा, सर्व विरोधकांची मागणी

हिवाळी अधिवेशन कालवधी वाढवा, सर्व विरोधकांची मागणी
, मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (08:50 IST)
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज राजभवन, मुंबई येथे माननीय राज्यपालांची भेट घेतली. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हा कालावधी पुरेसा नाही, अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहीजे अशी विनंती राज्यपालांना यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  यांच्यासह आ.राजेश टोपे विद्याताई चव्हाण, पंकज भुजबळ, सुमनताई पाटील, ख्वाजा बेग मिर्झा, रामराव वडकुते, राणा जगजितसिंह, प्रकाश गजभिये, संग्राम जगताप, वैभव पिचड, दीपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ, सतीश चव्हाण, बाळासाहेब थोरात, अब्दुल सत्तार, काँग्रेस पक्षाचे प्रतोद बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, नसीम खान, सुनिल केदार, डी.पी. सावंत, यशोमती ठाकूर, जयकुमार गोरे, डी. एस. अहिरे, पंकज भुजबळ, संग्राम थोपटे, भाऊसाहेब कांबळे, बबनदादा शिंदे, दत्तात्रय भरणे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जगन्नाथ शिंदे, जीवा गावीत आदी नेते उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाईन महासेल बंपर महासेल होणार बंद, लवकरच निर्णय