Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकरांना वडाळा ते जेकब सर्कल या मोनोरेलसाठी अजून किती वाट पहावी लागणार?

मुंबईकरांना वडाळा ते जेकब सर्कल या मोनोरेलसाठी अजून किती वाट पहावी लागणार?
, शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (08:42 IST)
तोट्यात चाललेल्या मोनो प्रकल्पासाठी सरकार आता जाहिरातदारांची मदत घेणार आहे. वर्सोवा-घाटकोपर या मेट्रो प्रकल्पानंतर आता ‘मोनो’च्या उत्पन्नातही जाहिरातीच्या मदतीने भर घालण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’प्रशासनाने घेतला आहे.पण वारंवार राष्ट्रवादीने निवेदन देऊनही वडाळा ते जेकब सर्कल ही मोनो रेल मात्र सुरु करण्यात आलेली नाही. वडाळा ते जेकब सर्कल असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबद्दल मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
म्हैसूर स्थानकात मोनोच्या एका डब्ब्याला आग लागल्यानंतर मोनो रेल दहा महिने बंद करण्यात आली होती. त्यानंतर १ सप्टेंबरपासून बंद असलेला पहिला टप्पा सुरु झाला खरा पण या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या आता मात्र कमी झाली. मोनोमध्ये प्रवास करणाऱ्या १८ हजार प्रवाश्यांची संख्या थेट फक्त १० हजारावर आली आहे. प्रवासीच नसतील तर जाहीरातदार तरी येणार कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
 
मोनो रेलचा सर्व कारभार पाहणाऱ्या मुंबई विकास प्राधिकरणाने सर्व प्रथम वडाळा ते जेकब सर्कल ही मोनो रेल सुरू करावी आणि प्रवासी कसे वाढतील याकडे भर देण्यात यावा, अशी मागणी अहिर यांनी केली आहे. मुंबईतील मोनो रेलच्या सर्व स्थानकाची कामे झालेली आहेत. यासाठी सुमारे ३००० कोटी रूपये खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना वडाळा ते जेकब सर्कल या मार्गासाठी अजून किती वाट पहावी लागणार आहे, हेही स्पष्ट करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अवनीचे बछडे दिसले, वनविभागाची माहिती