Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nagpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी वाचवले तरुणाचे प्राण

eknath shinde
, सोमवार, 18 डिसेंबर 2023 (11:29 IST)
नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका तरुणासाठी देवदूत बनून आले आणि त्यांनी तरुणाचे प्राण वाचविले. नागपूर सोलर कंपनीत स्फोटाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री नागपूरला गेले होते. नागपुरातून परत येत असताना गौंडखैरी बस स्थानकाजवळ अपघात झाल्याचे समजले. दुचाकी- ट्रक -वेगानं-आर कारची धडक होऊन तिहेरी अपघात झाला होता. या अपघातात दुचाकी ट्रकच्या बॉनेट मध्ये जाऊन अडकली होती. त्यावर चालक देखील होता. या अपघात दुचाकी वाहक जखमी झाला होता. तसेच कार मधील तिघे जण जखमी झाले.
 
अपघात झाल्याचे नागरिकांना  कळतातच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा तिथून निघत होता. अपघाताचं समजतात मुख्यमंत्री गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी तिथे उभे राहून दुचाकी स्वाराला ट्रक खालून बाहेर काढायला लावले. या अपघातात दुचाकी स्वाराला पायाला दुखापत झाली.

मुख्यमंत्र्यांनी ताफ्यातील रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात पाठविले आणि स्वतः रुग्णवाहिकेचा मागे जात नागपुरातील सेनगुप्ता रुग्णालयात आणले. तरुणाला तातडीनं आयसीयू मध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार करण्याचा सूचना दिल्या. तरुणाची तब्बेत स्थिर होई पर्यंत मुख्यमंत्री रुग्णालयातच होते. या तरुणाचे नाव गिरीश केशव तिडके आहे.  
मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे त्या तरुणाचा जीव वाचला. या साठी तरुणाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. 
 
Edited By- Priya DIxit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WHO ने कोरोनाचे नवीन सबवेरियंट JN.1 बद्दल चेतावणी दिली