Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर : फुगेवाल्याची ओळख पटली चिमुकल्याचा झाला होता मृत्यू

नागपूर :  फुगेवाल्याची ओळख पटली चिमुकल्याचा झाला होता मृत्यू
, बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:35 IST)
नागपूर : फुग्याच्या सिलिंडरच्या स्फोटात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२४) व्हीसीए स्टेडियमजवळ चर्चसमोर घडली. अवैधरीत्या गॅस दुस-या सिलिंडरमध्ये भरत असल्याने हा स्फोट झाल्याची बाब तपासात समोर आली आहे. पोलिसांना आरोपी फुगेवाल्याची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे.
 
सत्येंद्र सिंग (रा. पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सिझान आसिफ शेख (वय ४, रा. मानकापूर) ख्रिसमस असल्याने सदर परिसरातील चर्चसमोर खरेदीसाठी दुकान परिसरात नातेवाईकांसह फिरायला गेला होता. तिथे फुगेवाले दिसल्याने त्याने फुग्याची मागणी केली.
 
दरम्यान सत्येंद्र हा अवैधरीत्या एका गॅस सिलिंडरमधून दुस-या सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. त्यामुळे सिलिंडर हवेत उडाले आणि तिथे उभा असलेल्या सिझान याच्या अंगावर पडले. गॅसने त्याच्याजवळ असलेल्या फारिया हबीब शेख (वय २८) आणि अनमता हबीब शेख (वय २४ ) याही भाजल्या गेल्या. सत्येंद्रच्या गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आणि तो पसार झाला.

नंबरप्लेट, यूपीआयमुळे पटली ओळख
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असताना त्यांना एका वाहनाची नंबरप्लेट आढळून आली. पोलिसांनी तपास केला असता आरोपीची ओळख पटली. दरम्यान एका नातेवाईकाने त्याला यूपीआयवरून पेमेंट केल्यानेही त्याचा मोबाईल क्रमांक हाती लागला. सध्या त्याचा फोन स्विच ऑफ असून पोलिसांनी त्याच्या घरी चौकशी केली असता, तो फरार असल्याची माहिती समोर आली.

Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यवतमाळमध्ये ४८ तासांत ६ शेतक-यांची आत्महत्या