Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या
, शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (17:36 IST)
कांद्‍याचे भाव पडल्‍याने उत्‍पादन खर्च निघत नसल्‍यामुळे एका शेतकर्‍याने आत्‍महत्‍या केली. ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (व 25) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. ज्ञानेश्वर यांचे ७० हजार रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्ञानेश्वर यांच्यामागे आईवडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
 

त्यांच्याकडे 41 गुंठे शेती असून, आईवडीलांकडे दोन हेक्टर शेती आहे. त्‍यामध्ये शिवणकर यांनी एकरभर कांदा पीक घेतले होते. पंधरा दिवसांपुर्वीच कांद्‍याची काढणी केली होती. मात्र  कांद्याला कोंब फुटू लागल्‍याने, उत्पादन खर्च ही वसूल होण्याची शाश्वती राहिली नसल्याच्या कारणातुन विषण्ण अवस्थेत ज्ञानेश्वर याने पिऊन जीवनयात्रा संपविली. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार