Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत जाऊन धडक देणार, शरद पवार आंदोलनात उतरणार

sharad panwar
, शनिवार, 9 डिसेंबर 2023 (20:56 IST)
केंद्र सरकारने लादलेल्या निर्णयावर शेतकरी आता दिल्लीत जाऊन धडक देण्याचा निर्णय कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत दिघोळे यांनी या ठिकाणी आयोजित बैठकीमध्ये दिली आहे. 
 
केंद्र सरकारने कांद्यावर 7 डिसेंबर ला अर्ध्या रात्री कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे कांद्याच्या दरात निम्यापेक्षा अधिक घसरण झाल्याने एका दिवसात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही कांदा निर्यात बंदी तत्काळ हटवावी यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत जाऊन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल, गृहमंत्री अमित शहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. कांदा निर्यात बंदी तत्काळ हटवण्याची मागणी करणार आहे, असा ठराव शनिवारी देशवंडी ता. सिन्नर जि. नाशिक येथे झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला आहे.
 
या बैठकीत एकूण तीन ठराव करण्यात आले असून, महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादकांनी यासाठी कांदा उत्पादन संघटनेला साथ द्यावी, असे आवाहन कांदा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.
 
केंद्र सरकारकडून कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्यावर निर्यात शुल्क लागू करणे,कांद्याचे किमान निर्यात मूल्य वाढवणे, कांदा निर्यात बंदी करणे, नाफेड एनसीसीएफचा कांदा स्वस्तात विकून कांद्याचे भाव पाडण्याचे काम सातत्याने केले जात असताना राज्यातील व देशातील विरोधी पक्षही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे, ठामपणे उभे राहत नाही, याबाबतही शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची भावना आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही खंबीरपणे उभे राहत नाही.
 
त्यामुळे केंद्र सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे, याबाबतचाही ठराव बैठकीत करण्यात आला आह.
 
महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीत प्रतिक्विंटल तीन हजार रुपयेपेक्षा कमी दराने लिलावात बोली लागल्यास कांदा उत्पादक शेतकरी हे कांद्याचा झालेला लिलाव रद्द करतील आणि कोणीही शेतकरी व्यापाऱ्यांना तीन हजार पेक्षा कमी दरात कांदा देणार नाही, असे तीन महत्त्वाचे ठराव आज देशवंडी येथील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आले आहे.
 
शरद पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार  आहेत. कांदा निर्यातबंदीच्या विरोधात येत्या सोमवारी 11 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिक जिल्ह्यातील चांदवडला आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला स्व:ता शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदेनी चालवला समुद्र किनाऱ्यावर ट्रॅक्टर