Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर

टीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर
, गुरूवार, 17 जानेवारी 2019 (17:09 IST)
यावर्षीच्या टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजेच टीएचईच्या प्रतिष्ठित ‘Higher Education Emerging Economies ranking’ मध्ये भारतातल्या 49 शैक्षणिक संस्थांचा समावेश झालाय. यापैकी 25 संस्था टॉप 200 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. लंडनमधील टाइम्स हायर एज्युकेशनच्या आकडेवारीनुसार, चीनच्या सर्वात जास्त संस्था या यादीत आहेत. चीनच्या शिंगुआ विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळवलाय, तर पहिल्या पाचमध्ये चीनच्या चार संस्था आहेत. 
 
टीएचईच्या या यादीत भारतीय विज्ञान संस्थेने (IISc) 14 वा क्रमांक मिळवलाय. तर आयआयटी बॉम्बेचा 27 वा क्रमांक आहे. दोन्हीही संस्थांची रँकिंग गेल्या वर्षीच्या तुलनेत एका आकड्याने घसरली आहे. त्यामुळे या उच्च शिक्षणात कुठे तरी कमी पडल्याचं चित्र आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिल्या 100 मध्ये 93 व्या क्रमांकावर आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे