Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रस्ते व जलवाहतुकीसाठी वाहन कंपन्यांनी पुढाकार घ्यावा

रस्ते व जलवाहतुकीसाठी वाहन कंपन्यांनी पुढाकार घ्यावा
पुणे , शनिवार, 24 जानेवारी 2015 (15:10 IST)
आगामी काळात रस्ते विकासाबरोबरच देशांतर्गत जलवाहतूक विकसित करण्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार असून या कामात वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी जगभरातील वाहन कंपन्यांना केले. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल व कंपन्यांना आर्थिकदृष्टय़ा किफरयतशीर ठरेल, अशी जलवाहतूक विकसित करण्यासाठी सरकारकडून करसवलतीही देण्यात येईल, असे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी केले. यासाठी सरकारने 101 नवीन
जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव तयार केला असून येत्या अधिवेशनात तो संसदेत मांडला जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
 
कोथरूड येथील भारतीय वाहन संशोधन महामंडळ अर्थात एआरएआयच्या परिसरात सुरू असलेल्या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिसंवादाची (सिआट 2015) आज सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते.
 
देशातील रस्ते योग्य पद्धतीने बांधले गेले नसल्याने अनेक रस्त्यांवर अपघाताचे धोके आढळतात तेव्हा रस्तेबांधणी व विकासाच्या कामात भारतीय वाहन कंपन्यांनी पुढे यावे अन्यथा केंद्र सरकारला परदेशी कंपन्यांची मदत घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी वाहन कंपन्यांना दिला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi