Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगेशी मंदिर गोवा

mangeshi
, गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (19:30 IST)
मंगेशी मंदिर पणजी पासून 21 कि.मी. दूर गोवा मधील पोंडा तालुक्यात प्रिओलच्या मंगेशी गावात स्थित आहे. या मंदिराच्ये मुख्य आराध्य श्री मंगेश आहे. ज्यांना 'मंगिरीश' पण म्हटले जाते. त्यांना भागवान शिवाचे अवतार मानले जाते आणि इथे शिवलिंगच्या रुपात पूजले जाते. श्री मंगेश हिंदू गौड सारस्वत ब्राह्मणांचे कुलदेवता आहे. 
 
इतिहास- 
पहिले कुशस्थल गावात श्री मंगेश यांचे विशाल मंदिर होते. श्री मंगेश स्वयंभू लिंग त्यातच स्थापित होते. पण गोमांतक प्रदेशात जेव्हा पोर्तुगीजांनी प्रवेश करून उपद्रव प्रारंभ केला. तेव्हा भाविक भक्त श्री मंगेश यांना पालकित विराजमान करून ‘प्रियोल’ गावात घेऊन आले. काही दिवसांनी तिथेच मंदिर बनवले गेले. असे सांगितले जाते की, परशुराम यांच्याव्दारे यज्ञ कार्य संपन्न करण्यासाठी सह्याद्रि पर्वताच्या रांगांमध्ये जे ब्राह्मण परिवार तिरहुत वरून आणले गेले होते. त्यातीलच एक परमशिव भक्त शिव शर्मासाठी भगवान शंकर स्वयं या लिंगरुपात प्रकट झाले होते. भगवान शंकरांनी त्या वेळी पशुचे रूप धारण करून माता दुर्गाला भयभीत केले होते. भयभीत माता पार्वती आवाज देणार होत्या ‘मां गिरीश पाहि’, 'कैलाशनाथ मला वाचवा' पण भयभीत झाल्याने त्यांच्या मुखातून ‘मांगीश’ निघाले. भगवान प्रकट झाले तेव्हा पासून या शिवलिंगाचे नाव 'मांगीश' झाले. 
 
कथा-
भगवान मंगेश यांना परम आराध्य भगवान शिव यांचा अवतार मानले जाते. त्यांच्या उत्पत्ती सोबत एक खास रोचक प्रसंग जोडलेला आहे. एक प्रसिद्ध किवदन्तीच्या अनुसार, एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती कैलाश पर्वतावर सारीपाट खेळत होते. शंकरांनी सारखे हारुन अंततः शेवटच्या डावात स्वर्ग दांव वर लावून दिला आणि ते पण हारून गेलेत. खेळात हरल्यामुळे त्यांना आपले निवास्थान त्यागावे लागले. त्यांनी दक्षिणेच्या दिशेने चालणे प्रारंभ केले आणि सह्याद्री पर्वताला पार करत कुशास्थली जाऊन पोहचले. कुशास्थली मध्ये त्यांचे एक अनन्य भक्त लोपेश यांनी त्यांना इथेच रहा अशी विनंती केली. 
 
त्यानंतर देवी पार्वतीने पण स्वर्ग सोडून दिला व भगवान शंकरांना शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागल्या. एक घनदाट जंगलातुन जात असताना अचानक त्यांच्या समोर एक मोठा वाघ आला. ज्याला पाहून त्या घाबरून गेल्यात आणि मंत्राचा जप करू लागल्या. जो भगवान शंकरानी त्यांना स्वत:चे रक्षण करण्यासाठी शिकवला होता. मंत्र होता- "हे गिरिशा ममत्राहि" अर्थात् "हे गिरिराज (पर्वतांचे स्वामी) माझी रक्षा करा. पण माता पार्वती एवढ्या भयभीत होत्या की त्यांचे वाणीवर नियंत्रण राहिले नाही. आणि त्यांच्याकडून चुकीचा मंत्र बोलला गेला. "त्राहि माम गिरिशा" या मंत्राचे त्या उच्चारण करू लागल्या तेव्हा भगवान शिव ज्यांनी स्वत:च वाघाचे रूप धारण केले होते. लगेच वास्तविक रूपात आले. मग देवी पार्वतीच्या आज्ञानुसार, भगवान शिवांनी 'मम-गिरिशा' ला त्यांच्या नावांमध्ये सहभागी केले. ज्यांनी त्यांना ओळखले जाते व पूजले जाते. नंतर शिवांना मम-गिरिशाचे संक्षिप्त रूप 'मंगिरीश' आणि 'मंगेश' नावाने ओळखले जाऊ लागले. 
 
स्थापत्य- 
हे मंदिर गोव्याचे एक अन्य मंदिर शांता दुर्गा मंदिराच्या शैली मध्ये बनले आहे. इथे एक पाण्याचे कुंड देखील आहे. तसेच मंदिराचे सर्व स्तंभ दगडाने बनले आहे आणि यांच्या मध्ये एक भव्य दीपस्तंभ आहे. मुख्य कक्षात सभागृह आहे. हे मंदिर दर्शनासाठी दिवसभर उघडे असते. तसेच प्रत्येक सोमवारी इथे महाआरती केली जाते. सोमवारीच पालकित प्रतिमा ठेऊन यात्रा निघते. माघ महिन्यात इथे यात्राउत्सव देखील असतो. मंगेशी मंदिराची वास्तुकला विशेष आहे. हे मंदिर 18 व्या शताब्दी मध्ये बनले आहे. तसेच मंगेशी मंदिर हे गोव्यातील प्रमुख मंदिर आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विश्वकर्मा चालीसा Vishwakarma Chalisa