Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री शिवलीलामृत संपूर्ण अध्याय

Shree Shivlilamrut sampoorna adhyaay
महादेवाची कृपा प्राप्तीसाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.
 
सप्ताह पारायण पध्दत
कोणत्याही सोमवारी सायंकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वाहावी. देवाचे दर्शन घेऊन संकल्प घ्यावा की मी महादेवाला प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद, इष्ट कामना सांगत ती प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान् श्री शंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे. अशी प्रार्थना करुन तेथे किंवा घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. पोथी वाचताना शूचिर्भूत असावे.
 
सोमवार - अध्याय १ व २
मंगळवार - अध्याय ३ व ४
बुधवार - अध्याय ५ व ६
गुरुवार - अध्याय ७ व ८
शुक्रवार - अध्याय ९ व १०
शनिवार - अध्याय ११ व १२
रविवार - अध्याय १२ व १४
 
रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचावा. इतरांना ऐकायची असल्यास पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व दक्षिणा ठेवावी. दक्षिणा आणि पांढरे वस्त्र दान करु शकता.
 
रविवारी रात्री शंकराला जेवणाच्या पात्राचा नैवेद्य दाखवावा व हेच उद्यापन समजावे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री शिवलीलामृत अध्याय पंधरावा