Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेटचा ‍इतिहास

क्रिकेटचा ‍इतिहास

राकेश रासकर

क्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद मात्र सापडते. सतराव्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. पण त्याला सध्या असणारा क्रिकेट हा शब्द मात्र, क्रिकेट न खेळणार्‍या फ्रान्स या देशाची भाषा फ्रेंचमधून आला आहे.

पहिला आंतराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या जगमरात जवळपास २० देशात हा खेळ खेळला जातो. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड या देशात हा खेळ सर्वांत जास्त खेळला जातो.

क्रिकेटचा प्रसार करण्याचे श्रेयसुद्धा इंग्लंडला जाते. इंग्रजांनी ज्या देशांवर राज्य केले तेथे त्यांचे अधिका‍री क्रिकेट खेळत. त्यामुळे हा खेळ इंग्लंडबाहेर गेला. १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम बनायला सुरूवात झाली. १७७४ मध्ये त्यात प्रथम सुधारणा होत, पायचीत, तीन यष्टी, बॅटची लांबी यांचे नियम ठरवण्यात आले.

त्यानंतर दोन पंच नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७७८ साली लॉर्डसवर एमसीसी क्लबची स्थापना करण्यात आली. १७५१ साली यॉर्कशायर हे सामन्याचे पहिले अधिकृत ठिकाण ठरले. १७६० मध्ये गोलंदाजी चेडू टाकू लागले. फिरकी गोलंदाजी करू लागले. १७७२ मध्ये धावफलक निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या सुरवातीला लंडन व डार्टफोर्ड हे दोन क्लब अस्तित्वात आले.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये अमेरिका व कॅनडात झाला. १८५९ मध्ये इंग्लंडचे व्यावसायिक खेळाडू उत्तर अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले. १८६४ मध्ये ओव्हरआर्म गोलंदाजी टाकण्यात येऊ लागली. १८७७ मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली. १८८२ मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.

१८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी खेळणारा तिसरा देश म्हणून मान्यता मिळाली. १८८९ पर्यंत एक षटक चार चेंडूंचे होते. त्यानंतर पाच चेंडूंचे एक षटक झाले, तर १९०० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले. त्यानंतर आठ चेंडूंचे एक षटक करण्याचा प्रयोगही या क्रिकेट खेळणार्‍या तीन देशांमध्ये झाला. पुन्हा १९४० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले.

दुसर्‍या महायुध्दाच्या आधी भारत, वेस्ट इंडीज व न्यूझीलंड या तीन देशांना कसोटी खेळण्याची मान्यता मिळाली. युध्दानंतर पाकिस्तानलाही कसोटी खेळणारा देश म्हणून मान्यता मिळाली. विसाव्या शतकाच्या शेवटी श्रीलंका, झिंबाव्वे व बांगलादेश यांनाही मान्यता मिळाली. अशा तर्‍हेने क्रिकेट सर्वत्र पसरत गेले.

Share this Story:

Follow Webdunia marathi