Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर
ऑस्ट्रेलियात आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची  सांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी  66 पदकं खात्यात जमा करत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
 
भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण, 59 रौप्य आणि तितक्याच कांस्य पदकांची कमाई केली. त्या खालोखाल इंग्लंडने 45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर भारताच्या खात्यात 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे.
 
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 71 देशांनी सहभाग घेतला होता. यातील 43 देशांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्ण पदाकाच्या कमाईत भारताने कॅनेडालाही मागे टाकलं. कॅनेडाने यंदा 15 सुवर्ण पदकांची कमाई केली. तर भारताच्या खात्यात एकूण 26 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
 
भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी 
 
2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं
 
2006 (मेलबर्न) - 50 पदकं
 
2010 (दिल्ली) - 101 पदकं
 
2014 (ग्लास्गो) - 64 पदकं
 
2018 (सिडनी) – 66 पदकं 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदा अक्षयतृतीयेला सोन्याचा सर्वाधिक भाव