Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

31 जानेवारीपर्यंत तुमच्या गाडीच्या Fastagचं KYC करून घ्या, नाहीतर

Fastag
, बुधवार, 17 जानेवारी 2024 (11:17 IST)
31 जानेवारीपासून केवायसी पूर्ण न केलेले फास्टटॅग निष्क्रिय होणार असल्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच जाहीर केला आहे.
एकाच वाहनासाठी अनेक फास्टटॅग आणि केवायसीशिवाय होत असलेल्या फास्टटॅगच्या वाढत्या वापरामुळे हा निर्णय घेण्यात आला.
 
टोलनाक्यांवरील टोलवसुली अधिक कार्यक्षम व्हावी आणि विनाअडथळा वाहतूक व्हावी, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘वन व्हेइकल, वन फास्टटॅग’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे.
 
फास्टटॅगमध्ये केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया:
केवायसी प्रक्रिया ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्याद्वारे वापरकर्त्या ग्राहकांची ओळख निश्चीत केली जाते.
 
आर्थिक सेवांचा लाभ घेताना वापरकर्त्यांनी आपला केवायसी तपशील देणे आवश्यक असते. फास्टटॅगसाठीदेखील हे लागू आहे.
 
केवायसी तपशीलांमध्ये बदल झाला असल्यास तो बँकेकडे अद्ययावत करणे गरजेचे आहे.
 
आपला केवायसी तपशील अद्ययावत करण्यासाठी संबंधित बँकेला विनंती करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या बँकेच्या नजीकच्या शाखेत जाऊन अर्ज करावा. त्यानंतर बँक तुमची माहिती फास्टटॅग खात्यामद्ये अद्ययावत करेल.
 
केवायसीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, खालीलपैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र आवश्यक आहे.
 
वैध पासपोर्ट
ड्रायव्हिंग लायसन्स
मतदानकार्ड
पॅनकार्ड
आधारकार्ड
किंवा नरेगाने जारी केलेले आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेले जॉबकार्ड.
यासोबतच वाहन नोंदणी प्रमाणपत्राची (आरसी) प्रत सादर करणे आवश्यक आहे.
 
ही प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
फास्टटॅग चालू केल्यानंतरदेखील अद्यापही जर केवायसीची प्रक्रियाच केली नसेल, तर तुम्ही पुढीलप्रमाणे केवायसीची प्रक्रिया पूर्ण करु शकता.
 
1. Indian Highway Management Company Limited (IHMCL) FASTag portal.
 
या लिंकला भेट द्या.
 
2. तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड किंवा ओटीपीद्वारे लॉग इन करा.
 
3. डॅशबोर्डमधील ‘माय प्रोफइल’वर (My Profile) क्लिक करा.
 
4. केवायसी (KYC) ऑप्शनवर क्लिक करुन ‘कस्टमर टाईप’ (Customer Type) निवडा.
 
5. उरलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि तुमचे ओळखपत्र व पत्ता यांची प्रत जोडा.
 
अर्ज केल्यानंतर 7 दिवसांमध्ये तुमच्या केवायसीवर प्रक्रिया केली जाईल.
 
अजूनही जर तुम्ही फास्टटॅग खरेदी केला नसेल, तर तुम्ही तो टोल नाका, पेट्रोल पंप किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे बँक खाते फास्टटॅग वॉलेटसोबत जोडू शकता.
 
फास्टटॅग केवायसीची स्थिती आणि रिचार्ज मर्यादा
 
किमान केवायसी’च्या बाबतीत, कोणत्याही महिन्यात फास्टॅग वॉलेटचे मूल्य रू. 10,000/- पेक्षा जास्त नसावे. तसेच, एका आर्थिक वर्षात वॉलेटमध्ये भरलेली एकूण रक्कम रू. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये.
 
‘फुल केवायसी’च्या बाबतीत वॉलेटमधील जास्तीत जास्त रक्कम रू. 1 लाख रुपये असू शकते.
 
जेव्हा आपण आपले बचत खाते त्याच्याशी जोडाल, तेव्हा आपल्या फास्टॅग खात्याची स्थिती पूर्ण-केवायसी होईल.
 
Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Praggnanandhaa: प्रज्ञानानंद ने विश्वविजेता डिंग लिरेनचा पराभव केला