Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दैनंदिन जीवनात योगासनाचे फायदे जाणून घ्या

दैनंदिन जीवनात योगासनाचे फायदे जाणून घ्या
, सोमवार, 15 मार्च 2021 (19:19 IST)
योगासन केल्याने लवचीक, सुंदर मजबूत आणि निरोगी शरीर, शांत मन,चांगले आरोग्य मिळते या शिवाय योगासन केल्याचे अनेक फायदे आहे चला जाणून घेऊ या.   
 
1 संपूर्ण आरोग्य - 
योगासन केल्याने मानसिक शांती मिळते,शारीरिक शक्ती मिळते, शरीराची शुद्धी होते, मानसिक आरोग्य लाभते, शरीराचे संरक्षण होते आणि संपूर्ण आरोग्य चांगले राहते. 
 
2 वजन कमी होतो-
 सूर्य नमस्कार आणि कपालभाती प्राणायाम केल्याने शरीराचे वजन कमी होतो. नियमित पणे योगासन केल्याने आपल्याला काय आणि कसा आहार घ्यावा हे समजते त्या मुळे वजन वाढत नाही. 
 
3 तणाव पासून मुक्ती- 
दिवसभरातून काहीच मिनिटाचे योगासन केल्याने तणावापासून मुक्ती मिळते. ध्यान आणि प्राणायाम केल्याने तणाव दूर होते. योगासन शरीराला तणाव आणि हानिकारक तत्त्वांपासून मुक्त ठेवते. 
 
4 आत्मीय शांती- 
योगासन आपल्याला आत्मीय शांती मिळवून देतो. ध्यान केल्याने आत्मीय शांती मिळते. 
 
5 प्रतिकारक शक्ती सुधारते - 
आपण शरीर,मन आणि आत्माने बनलेले आहोत .शरीरात कोणतीही अनियमितता मनावर परिमाण करते. मनाची निराशा आणि थकवा हे शरीराच्या रोगाचे कारण आहे. योगासन केल्याने अवयव सामान्य स्थितीत राहतात आणि स्नायूंना सामर्थ्य देतात. प्राणायाम तणाव आणि चिंता कमी करते आणि शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुधारते.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणतीही परीक्षा न देता 8 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी