Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganesh Chaturthi 2023: या गणेश चतुर्थीसाठी मुगाच्या डाळीपासून बनवा गोड बुंदी , रेसिपी जाणून घ्या

boondi recipe
, सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (22:28 IST)
Ganesh Chaturthi 2023:उत्सव कोणताही असो... मिठाईचा समावेश नक्कीच केला जातो. सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे... त्यामुळे विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात आहेत. जन्माष्टमीनंतर प्रत्येकजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सर्वाधिक वाट पाहत असतात. 
 
ज्ञान आणि बुद्धीचे देवता श्री गणेशाचे सण 11 दिवस साजरे केले जाते. हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि त्यांच्यासाठी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे.
 
यावेळी जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरच्या घरी काही वेगळे आणि स्वादिष्ट गोड पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मूग डाळीची गोड बुंदीबनवून बाप्पाला नैवेद्य देऊ शकता. चला तर मग गोड बुंदी बनवायची सोपी रेसिपी जाणून घेऊ या. 
 
साहित्य
मूग डाळ- 1 वाटी
उडदाची डाळ- 4 चमचे
पाणी - 2 कप
साखर - 1 कप
वेलची पावडर- 1 टीस्पून
खाद्य रंग - 1 टीस्पून
 
कृती -
सर्व प्रथम एका भांड्यात मूग डाळ आणि उडीद डाळ काढा.आणि  मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. 
 हवे असल्यास तुम्ही डाळ 4 ते 5 तास भिजवू शकता. असे केल्याने पीठ अगदी सहज बनते. 
 
डाळी बारीक करून झाल्यावर एका भांड्यात काढून सर्व साहित्य तयार ठेवा. यावेळी गॅसवर भांडे गरम करण्यासाठी ठेवा.
पाणी आणि साखर घालून शिजवा. नंतर त्यात वेलची पूड घालून मिक्स करून एक ताराचे पाक तयार करा. 
आता कढईत तेल टाकून गरम करायला ठेवा. आता झारा घेऊन त्यावर बॅटर घालून तेलात सोडा. बुंदी तयार करा.
सर्व बुंदी तयार झाल्यावर साखरेच्या पाकात टाका आणि थोडा वेळ राहू द्या. गोड बुंदी  तयार आहे, बाप्पाला नैवेद्य द्या.  
 



Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कान पकडून उठाबशा करण्यामागील शास्त्रीय आधार