Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांद भरली रात आहे

Moon
, शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (15:44 IST)
चांद भरली रात आहे
चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहे
 
मंद वाहे गंध वारा
दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीव-नौका जात आहे
 
ना तमा आता तमाची
वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे
 
Lyrics - Kusumagraj कुसुमाग्रज
Music - Sriniwas Khale श्रीनिवास खळे
Singer - Ashalata Wabgaokar आशालता वाबगावकर
Natak - Vidushak विदूषक

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Constipation Home Remedies: ही 2 शक्तिशाली फळे बद्धकोष्ठता कायमची दूर करतात