Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Kavita झोपेचं न एक अजबगजब नाटक असतं

sleep without pillow
, सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (15:04 IST)
झोपेचं न एक अजबगजब नाटक असतं,
नेमकं सांगायचं कसं ते उमगत नसत,
जेंव्हा तिची अतिशय गरज असते ना, तेंव्हा ती येत नाही,
नसते गरज तिची अजिबात, तेंव्हा काही केल्या थांबत नाही,
जांभया वर जांभया येतात, नकोस होतं,
तिला थांबवणं केवळ अशक्यच असतं,
कधी कधी आराधना करवी लागते निद्रादेवीची,
कड परतवून परतवून थकतो आपण, पण मात्रा लागू नसते कशाची,
परीक्षेच्या काळात येणारी झोपेच वर्णन ते काय करावं,
आयुष्यात पुन्हा येत नाही ती अशी, असंच समजावं,
असतात काही लोकं, जे पडल्या पडल्या निजतात,
काही मात्र अंथरुणावरून आढयाकडे बघत बसतात,
एखाद्या कार्यक्रमात जावं, थंड वातावरण असतं,
निद्रादेवीला तिथं अगदी यायचंच असतं,
डोळे जड होतात कधी ते कळत नाही,
कार्यक्रम कुठं चाललंय हे आपल्यास कळतही नाही,
प्रवासात बसल्या बसल्या कित्येक जण , कधी न झोपल्या परी झोपतात,
दुसऱ्याला त्याचा त्रास होतोय, हे ही विसरतात,
तर असं अजबगजब तंत्र या झोपेचं,
पण त्यावरचं अवलंबून असत, घड्याळ माणसाचं!!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काही मुलांच्या हृदयाला छिद्र का असतं? यावर काही उपचार आहेत का?